-
मुबंई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 वर्षानंतर आपले बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शुक्रवारी भेट घेतली. राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. तब्बल सव्वा तास राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एका खोलीत बसून चर्चा केली तसंच एकत्र जेवण केल्याचीही माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या. तसंच निघण्याआधी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचं दर्शनही घेतलं. मात्र राज ठाकरेंच्या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.राज ठाकरेंच्या अचानक भेटीमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. येणा-या महापालिका निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी ही भेट असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपामध्ये गेले काही दिवस शाब्दिक चकमक सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील गरज लागल्यास सत्तेतून बाहेर पडू असा इशारा दिला होता. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडल्यास आपली रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट असावी अशीही शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे – शिवसेना युती होईल असे अंदाज वर्तवले होते, मात्र तेव्हा चुकलेली वेळ आत्ता साधून येते का ? हे पाहावं लागेल.बाळासाहेब ठाकरेंचा संपत्ती वाद आणि उद्धव ठाकरे- जयदेव ठाकरे यांच्यातील न्यायालयीन लढाई या पार्श्वभूमीवरही ही भेट असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.राज – उद्धव ठाकरेंच्या भेटीचा इतिहास –23 नोव्हेंबर 2008 – राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्ताने मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळी उद्धव आणि राज यांची भेट झाली होती.16 जुलै 2012 – उद्धव ठाकरेंना छातीत दुखू लागल्याने राज ठाकरे लिलावती रुग्णालयात भेटीला पोहोचले होते. राज ठाकरे यांनी कुटुंबासह उद्धव ठाकरे यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज यांनी पत्नीसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.20 नोव्हेंबर 2012 – बाळासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावेळी शिवाजी पार्कवर राज-उद्धव एकत्र3 नोव्हेंबर 2014 – राज ठाकरेंच्या मुलीला अपघात, उद्धव ठाकरे भेटीला गेले असताना राज यांची भेट17 नोव्हेंबर 2014 – बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शिवतीर्थावर राज-उद्धव एकत्र