ठाणे – कल्याण – नगर राष्ट्रीय महामार्गावर वेळ खिडींच्या करंजाळे गावानजीक रस्त्याला ७५ फूट लांब, ५ ते १० फूट खोल व ८ ते ९ इंच रूंदीची भेग पडली आहे. परिसरातील डोंगरवरुन मोठ्या प्रमाणात माहामार्गावर पाणी येत असल्याने हा रस्ता खचला आहे. यामुळे या माहामार्गावरील वाहतूक अघोषित काळासाठी बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माळशेजला जाणाऱ्या मार्गावरील वेळ खिंडीच्या पुढे रस्त्याला मधोमध मोठी भेग पडली. शुक्रवारी ही भेग पडली आसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रस्त्याला भेग पडून तो खचण्याचा धोका असून या ठिकाणीहून वाहतूक करणे धोक्याचे ठरणार असल्याचे सांगण्यात आले. माळशेज घाट, मढ, खुबी, खिरेश्वर, करंजाळे, परिसरात शनिवारीरही मुसळधार पाऊस सुरू आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसाने कल्याण-नगर माहामार्गावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आसल्याने मुळातच निकृष्ट असलेला रस्ता अनेक ठिकाणी खराब झाला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी व वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.