नवी मुंबई: बेलापूर किल्ल्याची गोवर्धनी आई या ऑडिओ कॅसेटचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर संपन्न झाले. याप्रसंगी कॅसेटच्या निर्मात्या आमदार मंदाताई म्हात्रे, ‘भाजपा’चे नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत, ठाणे जिल्हा विभाग अध्यक्ष मारुती भोईर, स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, नगरसेवक सुनिल पाटील, दीपक पवार, नगरसेविका उज्वला झंझाड, भगवानराव ढाकणे, कॅसेटचे निर्मिती सहाय्यक चंद्रकांत तांडेल आदि उपस्थित होते.
बेलापूर पट्टीतील बेलापूर किल्ले गांवठाण येथे पुरातन गोवर्धनी मातेचे मंदिर आहे. पूर्वीपासून या पट्टीतील मूळ स्थानिक आगरी-कोळी बांधव विशेषत: महिला वर्ग नवरात्री उत्सवाला आर्वजुन भेट देत असतात. गोवर्धनी मातेचे पुरातन मंदिर जीर्ण झाल्यानंतर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात गोवर्धनी मातेचे अतिसुंदर मंदिर उभारुन प्रकप्रकारे भक्तगणांना आगळी-वेगळी भेट दिली आहे.
तसेच गोवर्धनी मातेचे प्रार्थनेच्या रुपात गुणगान गाऊ या! या उद्देशाने आ. मंदाताई म्हात्रे यांनी ‘बेलापूर किल्ल्याची गोवर्धनी आई’ या ऑडिओ कॅसेटची निर्मिती केली आहे. या कॅसेटसाठी निर्मिती सहाय्यक म्हणून पत्रकार चंद्रकांत तांडेल यांनी काम केले असून कॅसेटमधील सर्व गाणी चंद्रकांत तांडेल यांनीच लिहिली आहेत.
तर या कॅसेटमधील गाणी गायिका भारती मढवी, गायक सतिश भानुशाली, संजय रानकर यांनी गायली असून त्यांना प्रमोद लोकरे आणि वैशाली जाधव यांनी साथ दिली आहे. संगीत संयोजक म्हणून संतोष नाईक, संजय रानकर आणि राजेश आदईकर यांनी काम पाहिले आहे.