- मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतील-मुंबई (आयआयटी-बी) दर दहा विद्यार्थ्यांपैकी सहा जण दोन किंवा तीन दिवसांतून एकदाच आंघोळ करतात. कारण तो त्यांना जाच वाटतो. दहा टक्के विद्यार्थी आठवड्यातून एकदाच तर ३० टक्के विद्यार्थी मात्र रोज आंघोळ करतात. आयआयटी-मुंबईतील वरिष्ठ विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहणीच्या दुसऱ्या टप्प्यातील हे निष्कर्ष आहेत.
या पाहणीतील प्रश्नांना शिकत असलेल्या, दोन पदव्या प्राप्त केलेल्या, एमएस्सी आणि एम टेक पदवीप्राप्त केलेल्या ३३२ विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली होती. पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृहातील जगण्याची नशा (हँगओव्हर) पुढेही काही काळ टिकून राहते. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत राहण्याचे ठरविले होते. २७ टक्क्यांनी घरी जायला पसंती दिली आणि एकट्याने राहण्याचा निर्णय १९ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला होता. दुसरीकडे ६६ टक्के विद्यार्थ्यांनी आपापल्या गावी नातेवाईकांशी घनिष्ट संबंध व संपर्क ठेवला होता तर २९.८ टक्के विद्यार्थ्यांनी पालकांशी सरासरीपेक्षाही कमी संबंध ठेवला होता. प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे खास स्वप्न असते ते म्हणजे मित्रांसोबत रस्त्याने गोव्याला जायचे. मुंबईत असे स्वप्न ५२.४ टक्के विद्यार्थ्यांनी साकारले होते.
७० टक्के विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेनने विनातिकीट प्रवास केला होता तर जेम्स बाँडच्या ‘कॅसिनो रोयाल’ या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन पोकर किंवा ब्लॅकजॅक खेळाचा आनंद ५५.७ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला होता. लग्न करण्यावर ३९.१५ टक्के विद्यार्थ्यांना पाच वर्षे तरी आपणच आपल्यासाठी खड्डा न खोदण्यास पसंती दिली होती. ३१ टक्क्यांनी या विषयावर काहीच सांगितले नाही तर २१.४ टक्के विद्यार्थ्यांनी तीन ते पाच वर्षांत लग्न करायचे सांगितले होते. धार्मिक श्रद्धेच्या प्रश्नावर ३९ टक्के विद्यार्थी आम्ही श्रद्धावान असल्याचे तर आम्ही नास्तिक असल्याचे २१ टक्क्यांनी व ३९ टक्क्यांनी आम्ही अज्ञेयवादी (ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान आपणाला नाही असे मानणारा-अग्नॉस्टिक) असल्याचे सांगितले होते.