युनायटेड खारघर ऍक्शन कमिटीची जनहित याचिका
नवी मुंबई / प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिके संदर्भात न्यायालयाने शासनाला निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतर खारघरमधील संघटनांनी एकत्र येऊन स्वतंत्र खारघर महापालिका करण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात याचिकादाखल केली आहे. युनायटेड खारघर ऍक्शन कमिटीच्या वतीने सदर जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्यामुळे पनवेल महापालिकेच्या मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
पनवेल शहरात राजकीय पक्षामार्फत अनेकांना प्रलोभन दाखवून नगरसेवकाची स्वप्न दाखवली जात आहेत. काही पक्ष खारघरवासियांनी आपल्या जाळ्यात फासण्याचा प्रयत्न करीत आहे. सदरचा प्रकार टाळण्यासाठीच याचिका दाखल करण्यात आली आहे. सिडकोने देखील खारघर शहराला पनवेल महापालिकेमधून वगळण्याची हरकत दाखल केली होती. काही वर्षात खारघर शहराची व्याप्ती मोठ्या संख्येने वाढणार असल्यामुळे सदर परिसरात स्वतंत्र महापालिका अस्तित्वात येणे गरजेचे असल्याचे कमिटीच्या सदस्यांनी सांगितले.