* वाशी मार्केट बनविण्याकरिता आमदार निधीतून १ कोटी रुपयांची मदत करणार
* आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने वाशी सेक्टर – ९(ए) येथे सुसज्य अशा बाजारपेठेचे प्रयोजन
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाण्यातील ‘जायंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणार्या बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी एफएसआय, आरोग्य यापाठोपाठ आता फेरीवाल्यांच्या समस्यांकरता आग्रही भूमिका मांडण्यास सुरूवात केली आहे.
आमदार झाल्यापासून प्रत्येक समस्येचे निवारण करण्यासाठी आ. मंदाताई म्हात्रे या स्वत: त्या ठिकाणी जावून पाहणी करत असल्याने समस्येचे गांभीर्य त्यांच्या तात्काळ निदर्शनास येत आहे. ४ सप्टेंबर रोजी बेलापूरच्या आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी वाशीतील सेक्टर ९ ए येथे पाहणी दौरा केला. वाशी सेक्टर ९ ए येथे काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली होती व त्यामध्ये येथील फेरीवाला मार्केट जमीनदोस्त करण्यात आले होते. यामुळे तेथील व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती, मात्र आता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत जातीने लक्ष घालून येथील व्यवसायिकांना सुसज्य असे सुमारे १५० हून अधिक गाळे असलेल्या तसेच उत्तम असे सौचालय असलेल्या भव्य अश्या बाजारपेठेची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आमदार निधीतून सुमारे १ कोटीची तरतूद करणार असल्याचेही सांगितले.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी चार दिवसांपूर्वी मार्केट कसे असावे ह्याचा आराखडा तेथील व्यावसायीकांसमोर प्रस्तुत केला. यामुळे निराधार झालेल्या व्यापार्यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मदतीने मोठा आधार मिळणार आहे. म्हणून व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याप्रसंगी व्यावसायीक व स्थानिक नागरिकांनी त्यांच्या समस्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या कडे मांडल्या व तेथील वाहन पार्किंग साठी झालेल्या रस्त्यांबद्दल स्थानिक रहिवाश्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
एकीकडे नवी मुंबईतील इतर प्रस्थापित मातब्बर राजकारणी आपल्या कार्यालयात बोलावून समस्या जाणून घेण्याकरता चर्चेच्या बैठका घेत असतानाच दुसरीकडे बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या घटनास्थळी जावून थेट चर्चा व समस्या जाणून घेत असल्याने मंदा म्हात्रेंच्या नेतृत्वाला ग्रासरूटवर पाठिंबा वाढत असल्याचे विविध प्रकरणात पहावयास मिळत आहे.