स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
मीरा भाईंदर : मेट्रोद्वारे मुंबईशी होऊ घातलेला वेगवान संपर्क, वसई पुलाच्या चौपदरीकरणामुळे सुटण्याच्या बेतात असलेली वाहतुक कोंडीची समस्या, सुर्या पाणी योजनेमुळे सुरळीत झालेला मुबलक पाणीपुरवठा या सर्व प्रकल्पांना केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारने दिलेली चालना यामुळे आगामी दहा बारा वर्षांत मीरा भाईंदर परिसराचा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे. भाजपाने सध्या देशात आणि राज्यात विकास हाच प्रमुख मुद्दा घेवून सुरू केलेल्या या कारभाराचे मीरा भाईंदरमधील तरूण मतदारांनाही आकर्षण असून मीरा भाईंदर महापालिकेचा कारभारही त्याच पद्धतीने व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेली अनेक वर्षे मीरा भाईंदरमधील अरुंद रस्ते, उघडी आणि तुंबलेली गटारे, रस्त्यातील खड्डे आणि वाहतुक कोंडी हे चित्र कायम होते. मात्र उच्च शिक्षण घेऊन स्मार्ट झालेल्या आणि स्मार्टफोन वापरणार्या तरूण पिढीला हे चित्र बदलावे अशी अपेक्षा होती. स्मार्ट पिढीच्या या अपेक्षांना मीरा भाईंदरचे तरूण आणि अभ्यासू आमदार नरेंद्र मेहता यांनी सर्वात प्रथम सकारात्मक प्रतिसाद दिला. आपल्या आमदारकीच्या टर्ममध्ये त्यांनी शहरात विकास कामांचा धडाका लावला. आमदारांच्या या प्रयत्नांना आता राज्य आणि केंद्र सरकारची देखील साथ लाभली आहे. सध्या वसई पुलाचे सुरू झालेले काम आणि त्यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्नही बर्यापैकी मार्गी लागला आहे. त्या सोबतच मेट्रो 7 चा मिरा भाईंदरपर्यंत झालेला विस्तार आणि सुर्या विभागिय पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून 21.8 कोटी लीटरचा शहराला सुरू झालेला पाणीपुरवठा, विकासाचे हे चित्र आता शहरातील तरूण मतदारांना आकर्षित करू लागले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी, अशी या तरूण वर्गाची अपेक्षा आहे. शहर चहुबाजूने विस्तारत चालल्याने पायभूत सुविधांची उभारणी करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. हे सर्व आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी तेवढ्याच सक्षम नेतृत्वाची गरज आहे.केंद्रातील तसेच राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या पारदर्शी कारभारामुळे मीरा भाईंदर महापालिकेतही भाजपाची सत्ता आल्यास विकासाच्या अनेक वाटा खुल्या होऊ शकतील, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.