नवी मुंबई, :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली विभाग कार्यालया अंतर्गत आठवडी बाजाराच्या कारवाईनंतर अतिक्रमणावर कारवाईचा धडाका आज बुधवारी देखील सुरु होता. राबाडा परिसरातील गौतमनगर येथील विनापरवाना उभारण्यात आलेल्या झोपडया आणि पदपथावर विनारपरवाना बनविलेल्या आणि मंडळांकडून उभारण्यात आलेल्या तब्बल ५ वाचनालयांवर कारवाई करण्यात आली.
घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रेय नागरे, अतिक्रमण अतिक्रमण अधिकारी रोहित ठाकरे यांच्या समवेत पथकाने ही धडक कारवाई केली.
घणसोली सेक्टर ४ येथे मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक सेवा भावी संस्था व संजय अंकल सेवा भावी संस्थेने उभारलेले वाचनालय, शांतीदूत सार्वजनिक वाचनालय, घणसोली घरोंदा सेक्टर-९ येथील संकल्प वाचनालय, जय भवानी वाचनालयावर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करुन भुई सपाट केले.
या विषयी माहिती देताना अतिक्रमण अधिकारी रोहित ठाकरे म्हणाले की, विनापरवाना आणि नियम बाहय कोणतेही अतिक्रमण केल्याचे आढल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.