नवी मुंबई :- नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अधिक सजग असून त्यांच्या जीवावर येथे पक्षाची ताकद आहे, असे सांगून नवी मुबई ही नेहमी कार्यकर्त्यांसाठी नेहमीच शक्तीस्थळ राहिलेली आहे, असे गौरवपूर्ण उदगार गणेश नाईक यांनी काढले आहेत.
पक्षाची सदस्य नोंदणी आणि पक्षांतर्गत निवडणुकांची माहिती देण्यासाठी मंगळवारी कोपरखैरणे येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्याप्रसंगी नाईक यांनी नवी मुंबईतील पक्षाच्या यशापयशाचे विश्लेषण करुन पुढील वाटचालीबाबत दिशानिर्देश दिले.
पक्षाचे जिल्हा निरिक्षक मुनाफ हकिम, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, महापौर जयवंत सुतार, महिला जिल्हाअध्यक्षा माधुरी सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ऍड जब्बार खान, सेवादलाचे प्रमुख दिनेश पारख, ज्येष्ठ समाजसेवक चंदू पाटील आदींसह नगरसेवक, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या मतांची टक्केवारी विरोधकांपेक्षा अधिक होती. पालिका निवडणुक निकालानंतर पक्षाची पकड अधिक मजबूत होत गेली. पुढील निवडणुका दोन तृतीयांश फरकाने जिंकू, असा विश्वास लोकनेते नाईक यांनी व्यक्त केला. पालिका निवडणुकीत जनतेने आपल्याला जो कौल दिला आहे. त्याची जाणिव ठेवून जनतेच्या अपेक्षांची पुर्तता करणे आपल्या सर्वाचं कर्तव्य असल्याचे आवाहन त्यांनी केले. नवी मुंबईत पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मत आणि मन प्रदर्शनाचे पूर्ण स्वातंत्रय असून सर्वाना सोबत घेवून सर्वाचो विचार एकून काम करण्याचे आपले धोरण असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.