सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : कोपरखैराणे येथील रा.फ.नाईक चौकातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर दुरूस्त करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणिस संदीप करंडे यांनी पालिका कोपरखैराणे विभाग अधिकारी यांच्याकडे एका लेखी तक्रारपत्रातून केली आहे.
बंद पडलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे परिसरात वाहतुक कोंडी वाढीस लागली असून शालेय मुलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे अपघात होण्याची भीती करंडे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.