सुजित शिंदे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील प्लॉट १५ वरील सिडकोच्या शिवम सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे सोसायटीत प्रथमच एका महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमधील ‘बी’ टाईपची ९६ सदनिकांची शिवम सोसायटी. भारताचा ७२वा स्वातंत्र्यदिवस सिवम सोसायटीत उत्साहाने साजरा झाला. सोसायटीच्या खजिनदार सौ. सुवर्णा संदीप खांडगेपाटील यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविताना ध्वजारोहण केले. यावेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष दिगंबर गावकर, माजी खजिनदार सोपान सावंत आणि सोसायटीच्या खजिनदार व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा संदीप खांडगेपाटील यांचीही यावेळी भाषणे झाली.
सोपान सावंत यांनी आपल्या भाषणातून समाजात कार्यरत असणार्या भ्रष्टाचारी राजकारण्यांवर कडाडून हल्ला चढविला. राजकारणात असणार्यांनी भ्रष्टाचार केला नसता तर देशाचा विकास अजून कैकपटीने झाला असता, परंतु भ्रष्टाचारामुळे देशाच्या विकासाला अडथळे आले असल्याचे सांगितले. दिगंबर गावकर यांनी स्वातंत्र्यदिनापासूनच्या आजतागायतच्या वाटचालीचा आढावा घेतला. सोसायटीच्या खजिनदार सौ. सुवर्णा संदीप खांडगेपाटील यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करून सांगताना स्वातंत्र्य आणि सुराज्य यातील फरक समजावून सांगितला. सोसायटीतील स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून सोसायटीला आपले घर समजल्यास सोसायटीत कोणताही वाद निर्माण होणार नसल्याचा आशावाद सौ. सुवर्णा संदीप खांडगेपाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार नलावडे, पदाधिकारी प्रभाकर पगारे, शेळके काका, दिलीप ढेरे, गणपत सावर्डेकर, जोशी, अभिमन्यू, मारूती बोरकर, बादशहा अत्तार, नवनाथ उरसळ, सतीश लाड, नारायण खामकर, हातेकर, चव्हाण, गणेश पवार यांच्यासह सोसायटीतील रहीवाशी मोठ्या संख्येने या स्वातंत्र्यदिन उत्सवात उत्साहाने सहभागी झाले होेते. यावेळी सोसायटीतील लहान मुलांची भाषणे झाली. मुलींनी स्वातंत्र्यदिनाची गाणी गायली. यावेळी सोसायटीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरूष, लहान मुले मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरदादा तांबे यांनी केले.