अमोल इंगळे
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५ आणि ८६च्या वतीने कुकशेतच्या महापालिका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या नागपंचमी उत्सव-२०१८ उत्साहात पार पडला.
दुपारी २ ते ६ या वेळेत नागपंचमी उत्सवाचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. कुकशेत गावात आयोजित या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नेरूळ नोडमधील महिला मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. या नागपंचमी उत्सवात श्री. नागदेवतेचे पुजन, पोथी वाचन व आरती,, पारंपारिक नृत्य, फेराची गाणी यासह महिलांच्या विविध स्पर्धा झाल्या.
यावेळी कार्यक्रमात सहभागी महिलांशी सुसंवाद साधताना नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील यांनी ‘आपली संस्कृती खुप महान व मोठी आहे. तिचे जतन करणे हे आपले कत्यव्यच आहे. अशा आयोजनांमुळे संस्कुती, कला, परंपरा जोपासणे हा उद्देश सार्थ होतो. येणार्या भावी पिढीला तिचे महत्व समजणेे व संस्कृती टिकून राहणे हा या कार्यक्रम आयोजनामागील उद्देश असल्याचे सांगितले..
या कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या ‘ ब’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा कविता आगोंडे , राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. रुपाली भगत यांची विशेष उपस्थिती लाभली.