नवी मुंबई : आपल्या अपेक्षा आणि इच्छा-आकांक्षांचे ओझे आपल्या मुलांवर न लादता त्यांचा कल बघून त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवू द्या, असे आवाहन गणेश नाईक यांनी केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक प्रकाश मोरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते मार्गदर्शन करीत होते. जन्माला कुठे यायचं? हे आपल्या हातात नाही मात्र चांगले कर्म करुन मोठे व्हायचं हे आपल्या हातात आहे, असा सल्ला नाईक यांनी दिला. अपयशाने खचून आत्महत्या करण्यापेक्षा शेवटच्या क्षणापयरत लढा, यश आपोआप मिळेल, असे मत त्यांनी मांडले. समाजसेवा करताना अनेकवेळा निराशा येते. अशा वेळेस गणेश नाईक यांची प्रेरणा आणि ऊर्जा कामी येते, अशा भावना कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक प्रकाश मोरे यांनी व्यत केल्या. नवी मुंबईला नाईक यांचे खंबीर नेतृत्व लाभले आहे, असे सांगून प्रभागात सुरु असलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, सभागृहनेते रविंद्र इथापे, प्रभाग समिती सभापती शशिकांत राऊत, कार्यक्रमाचे अयोजक नगरसेवक प्रकाश मोरे आणि माजी नगरसेविका शिल्पा मोरे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल धुमाळ, परिवहन समितीचेमाजी सभापती श्यामराव महाडिक, माजी नगरसेविका शारदाताई डोंगरे, एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस विनायक मेहेर, प्रभाग अध्यक्ष उदय दळवी, राज शेळके, श्री. पवार, सोसायटयांचे पदाधिकारी, रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्याथ्यारचा गुणगौरव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यायामशाळा व पादचारी पुलाचे नूतनीकरण झालेल्या कामाचे उद्घाटन असे कार्यक्रम पार पडले.