मुंबई : साधकाला अटक केल्यावर त्यांचा नि आमचा काहीही संबंध नसल्याची पुडी सोडणे ही सनातन संस्थेची कार्यपद्धती असल्यामुळे यावर विश्वास न ठेवता एटीएस ने मास्टर माईंड डॉ.जयंत बाळाजी आठवले याना अटक करावी अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा.शयाम मानव यांनी आज एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.
मनोज भोयर यांनी जय महाराष्ट्र या वृत्त वाहिनीसाठी मानव यांची मुलाखत घेतली होती,कर्नाटक पोलिसांची महाराष्ट्रात धरपकड वाढल्यावर इथले पोलीस वेगवान झाले हे खरे असले तरी महाराष्ट्र एटीएस करीत असलेल्या तपासाबाबत आपण समाधानी असल्याचे मानव म्हणाले.
सनातनवर बंदी घालून आठवले याना अटक करणे याला पोलिसांनी प्राधान्य दिले नाही तर आगामी काळात सनातन शेकडो व्यक्तींना धर्मद्रोही ठरवून त्यांची हत्या घडवून आणेल अशी भीतीही प्रा मानव यांनी व्यक्त केली आहे,हे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे असल्यामुळे सनातन,हिंदू जनजागृती समिती ,श्रीराम सेना या सारख्या कट्टर आणि देशाला घातक असणाऱ्या संघटनांवर कारवाई शक्य आहे असेही ते म्हणाले,
खून करून खुनाचा कट,योजना मारेकऱ्यांच्या मेंदूत राहणार नाही अशी स्मृती पुसून टाकण्याची कला समोहणातून केली जाऊ शकते,चार जणांच्या हत्त्येत हीच पद्धती वापरण्यात आल्याचे मानव म्हणाले