* व्यापारी व नागरिकांचा बंदला उत्स्फूर्त पाठींबा * मनसेच्या आवाहनानंतर एपीएमसी व्यवहार बंद
नवी मुंबई : सर्व पक्षीय भारत बंदला मनसेने पाठींबा देत आज बंद मध्ये सक्रीय सहभाग घेतला. याच धर्तीवर नवी मुंबईत देखील सकाळी आठ वाजल्यापासून नवी मुंबई मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी सत्ताधारी भाजप सरकारच्या कारभारामुळे निर्माण झालेल्या महागाई विरोधात बंद मध्ये सहभागी होण्यासाठी व्यापारी व नागरिकांना आवाहन करत होते. नवी मुंबईतील बेलापूर, नेरूळ, सीवूड्स, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, ऐरोली या सर्व विभागात सकाळपासूनच मनसैनिकांनी व्यापारी व नागरिकांना आवाहन करून कडकडीत बंद पाळला.
शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे व्यापाऱ्यांना आवाहन करून मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यवहार बंद ठेऊन सत्ताधारी मोदी भाजप सरकारचा निषेध करण्याचे आवाहन केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर मनसे कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा देऊन दणाणून सोडला. “मोदी सरकार हाय हाय”, “या सरकारच करायचं काय, खाली डोकं वरती पाय”, “फेकू मोदीचा निषेध असो निषेध असो” असा घोषणा नवी मुंबई मनसैनिकांनी याप्रसंगी दिल्या. व्यापाऱ्यांनी देखील मनसेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन व्यवहार बंद ठेवला.
वाशी सेक्टर -१७ येथील पेट्रोल पंप देखील शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी बंद पडला. यावेळी तिथे पेट्रोल, डीजेल भाववाढीचे फलक मनसे तर्फे लावण्यात आले.
ऐरोली येथील ठाणे बेलापूर महामार्गावर मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी निलेश बाणखेले, रुपेश कदम, गणेश म्हात्रे, प्रविण घोगरे, दिनकर पागिरे, सचिन निकम, जमीर पटेल, निखिल थोरात, प्रविण फापळे, दशरथ सुरवसे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक व सुटका केली.
वाशी येथील शिवाजी चौकात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेने संयुक्तपणे सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येने या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महिला आघाडीने या प्रसंगी चुल्हीवर भाकरी बनवून मोदी सरकारचा निषेध नोंदवला.
ही महागाई अशीच वाढत राहिली तर पंतप्रधान मोदींचे नवी मुंबईत चौका-चौकात लोकसहभागाने पुतळे जाळू असा जाहीर इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी याप्रसंगी दिला.
या नवी मुंबई बंद मध्ये मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष संदीप गलुगडे, निलेश बाणखेले, नितीन चव्हाण, विनोद पार्टे, सचिव श्रीकांत माने, सचिन आचरे, रुपेश कदम, सह-सचिव सचिन कदम, विनय कांबळे, शशिकांत कळसकर, अमोल इंगोले, शरद डिगे, महिला आघाडीच्या डॉ.आरती धुमाळ, अनिथा नायडू, गायत्री शिंदे, शुभांगी बंदिछोडे, वाहतूक सेनेचे नितीन खानविलकर, विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, निखील गावडे, महापलिका सेनेचे अप्पासाहेब कोठुळे, अमोल आयवळे, अभिजित देसाई, जनहित कक्षाचे समीर जाधव तसेच विभाग अध्यक्ष विक्रांत मालुसरे, श्याम ढमाले, प्रेम जाधव, अरुण पवार, आशिष कुटे, अभिलेश दंडवते, सुधीर पाटील, लीलाधर घाग, नितीन नाईक व मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक रत्यावर उतरले होते.