दुबई : प्रथम फलंदाजी करुन 285 धावांची मजल मारल्यानंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत दुबळ्या हाँगकाँगला किती धावांनी नमवणार हीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली होती. मात्र हाँगकाँगने अत्यंत कडवी झुंज देत बलाढ्य भारताला विजय मिळवण्यासाठी अक्षरश: झुंजवले. भारताच्या 286 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगने 50 षटकात 8 बाद 259 अशी मजल मारली. सामना भारताने अवघ्या 26 धावांनी जिंकला असला, तरी हाँगकाँगने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नाणोफेक जिंकून हाँगकाँगने भारताला फलंदाजीस निमंत्रित केले. यावेळी भारत धावांचा डोंगर उभारणार अशीच आशा होती. मात्र हाँगकाँगने भारताला तिनशेच्या आत रोखले. शिखर धवनने (127) दमदार शतक ठोकले. यानंतर भारतीय गोलंदाजांच्या वर्चस्वाची अपेक्षा होती. मात्र, निझाकत खान व कर्णधार अंशुमन राठ यांनी 174 धावांची जबरदस्त सलामी देत संघाला एकवेळ विजयी मार्गावर ठेवले. यावेळी हाँगकाँग सर्वात धक्कादायक विजय मिळवणार अशीच शक्यता होती. मात्र अखेर भारताने अनुभवाच्या जोरावर बाजी मारली. कुलदीप यादवने अंशुमनला बाद करुन ही जोडी फोडली. अंशुमनने 97 चेंडूत 4 चौकार व एका षटकारासह 73, तर निझाकतने 115 चेंडूत 12 चौकार व एका षटकारासह 92 धावांची खेळी केली. पाठोपाठ निझाकत खलील अहमदचा शिकार ठरला. निझाकतची 92 धावांची खेळी ही त्याची आयसीसीच्या पुर्ण सदस्य असलेल्या संघाविरोधात सर्वोच्च धावसंख्या आहे. हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर होते. तोर्पयत भारतीय गोलंदाज हैराण झाले होते. मात्र नंतर भारतीयांनी हाँगकाँगच्या फलंदाजांना टिकु दिले नाही.
तत्पुर्वी भारताने धवनच्या जोरावर 285 धावा केल्या. धवनने 12क् चेंडूत 15 चौकार व 2 षटकारांसह 127 धावा फटकावल्या. कर्णधार रोहित शर्माने 22 चेंडूत 23 धावा केल्या. धवन व अंबाती रायडू (60) यांनी 116 धावांची भागीदारी करत भारताला सावरले. रायडूने 7क् चेंडूत 3 चौकार व 3 षटकार लगावले. तो बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने 38 चेंडूत 33 धावा केल्या. त्याने धवनसह 79 धावांची भागीदारी केली. कार्तिक बाद झाल्यावर मधली फळी कोलमडून पडली.
—————————
संक्षिप्त धावफलक :
भारत : 50 षटकात 7 बाद 285 धावा (शिखर धवन 127, अंबाती रायडू 6क्, दिनेश कार्तिक 33; किंचित शाह 3/39) वि.वि. हाँगकाँग : 50 षटकात 8 बाद 259 धावा (निझाकत खान 92, अंशुमन राठ 73; युझवेंद्र चहल 3/46, खलील अहमद 3/48, कुलदीप यादव 2/42.)
——————————–
14वे एकदिवसीय शतक झळकावलेला धवन भारताकडून सर्वाधिक शतक झळकावणारा संयुक्तपणो सहावा फलंदाज ठरला. युवराज सिंगनेही 14 शतके झळकावली आहे. धवनपुढे विरेंद्र सेहवाग (15), रोहित शर्मा (18), सौरव गांगुली (22), विराट कोहली (35) आणि सचिन तेंडुलकर (49) यांचा क्रमांक आहे.
निजाकत खान आणि कर्णधार अंशुमन रथ यांच्या बहारदार खेळीने हाँगकाँगला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांचा सफाईने सामना करताना 10 षटकांत 56 धावांची भागीदारी केली.
भारताच्या 285 धावांचे कोणतेही दडपण न घेता हाँगकाँगच्या खेळाडूंनी संयमी सुरूवात करताना संघाच्या धावांचा वेग वाढता ठेवला. त्यांनी पाच षटकांत19 धावा केल्या.
भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश, 7 बाद 285 धावा
दुबई, आशिया चषक 2018 : शिखर धवन आणि अंबाती रायुडू यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या लढतीत हाँगकाँगविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रायुडू व धवन बाद होताच भारताच्या अन्य फलंदाजांनी झटपट तंबूची वाट धरली. त्यामुळे भारताला 286 धावांचे लक्ष्य उभे करता आले.