सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
मुंबई ; भारतात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे त्यातच अनेक उद्योजक महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यास इच्छूक आहेत असे सांगत भारतीय अर्थव्यवस्थेत मराठी उद्योजकांचेही मोठे योगदान असल्याचे मत क्लीव्हलँड सायकलवर्क्स इंडिया चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संग्राम विलासराव पाटील यांनी व्यक्त केले. अमेरिकेतील प्रसिद्ध क्लीव्हलँड मोटरसायकलचे भारतातील पहिले दालन नवी मुंबई चे पालकमंत्री
गणेश नाईक यांच्या हस्ते वाशी येथे सुरू करण्यात आले असून या दालनाचे उद्घाटन परसंगी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव देसाई यांच्यासह आमदार संदीप नाईक व कंपनीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अमेरिकेतील क्लीव्हलँड मोटारसायकलचे भारतात आगमन झाले असून भारतातील पहिले दालन सुरू करण्याचा मान नवी मुंबई शहराला मिळाला आहे.
२हजार चौ.फु. असलेले हे दालन वाशी येथे सुरू करण्यात आले. क्लीव्हलँड सायकलवर्क् ब्रँड सध्या जगभरात त्याचे उत्पादन विकतो आणि त्याचे वितरण 23 देशांमध्ये केले जाते. क्लीव्हलँडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संग्राम विलासराव पाटील यांनी यावेळी सांगितले की, “क्लीव्हलँड सायकलवर्क्स मोटरसायकल संपूर्ण जगभरातील उत्साही लोकांना संपूर्ण बाइकिंग जीवनशैलीचा अनुभव घेता येणार आहे. इतर देशातील तरुणांसाठी ही मोटरसायकल आकर्षणाचा बिंदू आहे. मात्र आता भारतात आणि विशेष म्हणजे नवी मुंबई मध्ये या गाडीचे आगमन झाल्यामुळे संपूर्ण मुंबई भागातील तरुणांना ही मोटरसायकल नक्कीच पसंतीची ठरणार आहे. तसेच ही मोटर सायकल प्रदूषण रोखण्यास मदत करणार आहे. याचे इंजिन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या गाडीची भारतातील किंमत २लाख ४० हजार इतकी असून विविध श्रेणी मध्ये उपलब्ध आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली .
250-500 सीसी बाइक सर्वात नवीन डीलरशिप रेट्रो-प्रेरित मोटरसायकल – ‘एस् डिलक्स’ आणि ‘मिस्फीट’, क्लीव्हलँड सायकलवर्क्स मोटरसायकलच्या सध्याच्या श्रेणीतील दोन मॉडेल आणि भारतीय ग्राहकांसाठी विविध डिझाइन पर्याय उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये मुख्यालय असलेल्या ब्रँडची पुण्यात असेंबली करण्यात येणार आहे.