नवी मुंबई : प्रभाग दौरे, आमदार आपल्या दारी, विकास कामांचे पाहणीदौरे अशा अनेक उपक्रमांतून जनतेशी थेट संवाद साधून आमदार संदीप नाईक जनतेच्या समस्या सोडवित असतात. याच भूमिकेतून त्यांनी जन संवाद हा अभिनव उपक्रम सुरु केला. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या विभागांसाठी आतापयर्ंत यशस्वीपणे पार पडलेल्या जनसंवाद उपक्रमांस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आपल्या समस्यांची सोडवणूक होते, असा नागरिकांचा अनुभव आहे. आता येत्या ७ ऑक्टोबर २०१८ रोजी ऐरोली विभागाकरिता सकाळी १० वाजता लेवा पाटीदार हॉल, सेक्टर १९, ऐरोली याठिकाणी हा उपक्रम पार पडणार आहे.
या उपक्रमामध्ये शासकीय आणि निमशासकीय विभागांशी संबंधीत लेखी समस्यांचे निवेदन नागरिकांना सादर करता येईल. जन संवादसाठी येताना निवेदनाच्या तीन प्रती नागरिकांनी सोबत आणावयाच्या आहेत. महापालिका, महावितरण, सिडको, एमआयडीसी, पोलीस, महानगर गॅस इत्यादी शासकीय आणि निमशासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे निवारण या उपक्रमात करण्यात येणार आहे. ज्या समस्यांची सोडवणूक उपक्रमादरम्यान करणे शक्य आहे, त्यासंबंधीची कार्यवाही तात्काळ करण्यात येणार असून उर्वरित प्रश्नांची सोडवणूक कालबध्दरित्या करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी त्यांच्या समस्यांची लेखी निवेदने सादर करुन मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी केले आहे. जन संवाद उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९०२९८०००७० किंवा ९०२२८४२०२०, या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आमदारकीच्या सलग दुसर्या कार्यकाळातही आमदार संदीप नाईक यांनी जनतेशी नियमित लोकसंपर्क ठेवून त्यांच्या अडचणी सोडविल्या आहेत. महावितरण, सिडको, एमआयडीसी, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस, महानगर गॅस, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग अशा विविध शासकीय आणि निमशासकीय खात्यांतील अधिकार्यांच्या बैठका घेवून ते जनतेच्या समस्यांचे निवारण करीत असतात. आपल्या ऐरोली येथील जनसंपर्क कार्यालयात नियमितपणे नागरिकांना भेटून त्यांच्या अडचणींचे निराकरण करीत असतात.