करंजाडे मध्ये सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांची शब्दपूर्ती
पनवेल : करंजाडे येथे गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा भेडसावणारा प्रश्न सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या पुढाकाराने सुटला असून करंजाडेकरांना दिलेल्या शब्दाची त्यांनी पूर्ती केली आहे.
करंजाडे नोड मध्ये पाणी व इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतीक संस्थेच्यावतीने सिडको विषयक समस्या निराकरण सभा अर्थात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी डिसेंबर महिन्याच्या आत पाणी प्रश्न सोडविण्याचे करंजाडेकरांना आश्वासित केले. त्यानुसार सिडकोच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन टाकीचे काम पूर्ण करण्याचे सूचित करण्याबरोबरच त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या महत्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आजपासून (०१ डिसेंबर) करंजाडे मधील सर्व सेक्टरमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला असून त्याबद्दल येथील नागरिकांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, ज्येष्ठ नेते कर्णा शेलार व भारतीय जनता पार्टी आणि श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतीक संस्थेचे आभार व्यक्त केले.