अनंतकुमार गवई
नवी मुंबई : श्री दत्त विद्यामंदिर सानपाडा ( नमुंमपा शाळा क्र.१८) व माध्यमिक शाळा क्र ११६ च्या माध्यमातुन नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील एकमात्र वर्धापनदिन तसेच शिक्षक / विद्यार्थी /पालक ह्यांचा कौटुंबिक स्नेह संमेलन सोहळा हज़ारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थित मोठया जल्लोषात साजरा झाला.. खाज़गी शाळेशी स्पर्धा करत असतांना आपल्या नमुंमपा शाळेतील ग़रीब कष्टकरी विध्यार्थी वंचित राहु नये या व्यापक दृष्टिकोनातुन स्थानिक नगरसेविका कोमल सोमनाथ वास्कर यांच्या वतीने दरवर्षी आयोजन करण्यात येते. नृत्यांगना डांस अकॅडमी चे ईशांत ठाकुर व साक्षी ठाकुर ह्यांनी यावर्षी छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण जीवन चरित्र नृत्यावर आधारित थीम विद्यार्थी वर्गाकडुन सादरीकरण केल्यामुळे समस्त पालक वर्ग व उपस्थित रसिक वर्गानी त्यांचे कौतुक केले.. नमुंमपा शाळेय विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याच पवित्र कार्य करण्याचा सर्व गुरुजनांचा ( शिक्षक वर्ग) तसेच बहुऊद्देशीय कामगारांचा सन्मान मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.. तसेच स्वछ भारत अभियांना अंतर्गत स्वच्छ शाळा शासकीय ( तुर्भे विभाग ) मधून श्री दत्त विद्यामंदिर सानपाड़ा शाळेची निवड झाली म्हणुन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अय्याऊद्दिन शेख़ सर आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा कूदळे यांचा ग्रामस्थ व रहिवाशीयांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.. या कार्यक्रमास शिवसेना शहरप्रमुख विजय माने, सेवन्थ डे स्कूल चे प्राध्यापक जे पी पीटर सर, स्थानिक नगरसेविका सौ. कोमल वास्कर, नगरसेवक सोमनाथ वास्कर , नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार , उपज़िल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, विभागप्रमुख भाऊँ भापकर, उपविभागप्रमुख तथा परिवहन समिति सदस्य विसाजी लोके, उपविभागप्रमुख- गणेश पावगे, विनोद माने, गणेश मानकर , सहयोग मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश वास्कर , शाळा व्यवस्थापन समितिचे शत्रुघ्न पाटील, सुभाष शिर्के , युवासेना उपशहर अधिकारी आशिष वास्कर, शाखाप्रमुख अजय पवार , अनंता ठाकुर, लावणी सम्राट अस्मित कामठे ,शिवसेना महिला आघाड़ी सौ. सुरेखा गव्हाणे, सौ. सावित्री चौगुले, सौ.कविता ठाकुर,सौ.वंदना चौगुले, सौ. सुलभा केसरकर तसेच मोठया प्रमाणात ग्रामस्त व पालकवर्ग उपस्थित होता. तर नमुंमपा शाळेतिल विद्यार्थ्याचा दर्ज़ेदार कौटुंबिक स्नेह सोहळा व स्नेह भोजनाचे आयोजन करणारे स्थानिक नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर व नगरसेवक सोमनाथ चिंतामण वास्कर ह्यांना सन्मानित करण्यात आले.. अरुण अहिरे ह्यांच्या सूत्रसंचनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली..
स्थानिक नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर व आधार फ़ाऊंडेशन च्या वतीने नमुंमपा शाळेतिल तसेच ग़रीब व गरजु विध्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका तसेच इयत्ता ७ वी १० पर्यंत विनामूल्य शिकवणी वर्ग चालु करण्यात आला आणि विद्यार्थी वर्ग़ास १००% योगदान देण्याचे आवाहन नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर यांनी करुन अधिकाधिक सुविधा प्राप्त करुन देण्याचे वचन दिले.