अनंतकुमार गवई
नवी मुंबई : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या परिवहन उपक्रमाने दहावी व बारावीच्या परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवासात सूट देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.
२२ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत (H.S.C) उच्च माध्यमिक व १ मार्च ते २२ मार्च २०१९ ( S.S.C) माध्यमिक विभागाच्या परीक्षा जाहीर झालेल्या आहेत. या कालावधीत बेस्ट परिवहन उपक्रमाने या परीक्षार्थी विद्यार्थ्यांकरिता प्रवासात सवलत जाहीर केलेली आहे, त्याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने देखील सवलत जाहीर करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली. यावेळी दत्ता घंगाळे यांच्यासमवेत युवा जिल्हा सरचिटणीस रणजित नाईक व नेरूळ पूर्व युवा मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक उपस्थित होते.