अॅड. महेश जाधव
नवी मुंबई : दिव्यांग व्यक्तीस स्वंयरोजगाराच्या जागा प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला नव्याने मुदतवाढदेण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नेरूळ तालुका काँग्रेस अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांंकडे केली आहे.
दिव्यांग व्यक्तीस स्वंयरोजगाराकरीता जागा उपलब्ध करून देणेकरीता प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरूवात केली आहेे., याबाबत सर्वप्रथम महापालिका प्रशासनाचे अभिनंदन. याबाबत महापालिका प्रशासनाने वर्तमानपत्रात जाहिरातही दिलेेली आहे. परंतु ही जाहिरात व प्रक्रिया लोकसभा निवडणूक कालावधीदरम्यान सुरू झालेली आहे. त्यामुळे दिघा ते बेलापुरदरम्यानच्या अपंग व्यक्तींना महापालिकेची प्रक्रिया माहिती पडलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या स्तुत्य उपक्रमाला मर्यादा पडल्या आहेत. दिव्यांग सध्या बेरोजगार आहेत. हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे त्या दिव्यांगांंना स्वबळावर सक्षम होण्याकरिता स्टॉल मिळालेच पाहिजेत. त्या स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांग स्वत:ची व परिवाराची उपजिविका भागवू शकतील. आपण याबाबत आपल्या हेतूला व उपक्रमाला दिव्यांगांचे खरोखरीच भले व्हावे असे वाटत असेल तर या योजनेला मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. आपण निवडणूक कालावधी आणि दिव्यांग या प्रक्रियेपासून अंधारात असणे याबाबत गांभीर्याने विचार करून नवी मुंबईतील सर्वच दिव्यांगांना योजनेचा लाभ होण्यासाठी या प्रक्रियेला नव्याने मुदतवाढ देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रवींद्र सावंत यांंनी केली आहे.