नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत आणि प्रभाग ९६च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या माध्यमातून प्रभाग ९६ व ९७ मधील नेरूळ सेक्टर-१६,१६ए,१८,१८ए,२४ परिसरातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा घरोघरी जावून सत्कार केला जात आहे.
नेरुळ प्रभाग क्रमांक-९६/९७ मध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा घरोघरी जावून रविवार, दि. २३ जूनपासून घरोघरी सत्कार अभियानास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत आणि प्रभाग ९६च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्यासमवेत प्रभाग ९७ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वार्ड अध्यक्ष संजय पाथरे ,९६ चे वार्ड अध्यक्ष अशोक गांडाल, महिला वार्ड अध्यक्षा सौ. प्राजक़्ता प्रभु, सौ.सुरेखा देठे, विमल गांडाल, सागर मोहिते, दादा पवार, विकास तिकोने, विनोद पोटे, शरद भोर, दादासाहेब लोंढे, गुलाब लोंढे, नानासाहेब खंडाग़ले, रविंद्र गावंड, सुरेश नलावडे, रविंद्र भगत, राम सावंत, रामदास केंजळे, प्रभाकर माने, महादेवव गर्जे, जयवंत लाड या अभियानात सहभागी झाले होते. या अभियानात दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या ३२० विद्यार्थ्यांचा घरोघरी जावून सत्कार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्यांना शैक्षणिक कार्यास उपयुक्त ठरेल अशा फोल्डरची यावेळी राष्ट्रवादीकडून भेटही देण्यात आली.
- इयत्ता १० वी
रिद्धिश सर्जेराव पाटिल ९७.६०%(प्रथम क्रमांक)
यश विकास यादव ९५.४०% (द्वितीय क्रमांक)
वैष्णवी गंगाधर परब ९४.८४ %(तृतीय क्रमांक)
- इयत्ता १२ वी
तेजेस्विनी मनोहर मांदाडकर ९१ %(प्रथम क्रमांक)
अंजली दिपक भानुशाली ९०.७%(द्वितीय क्रमांक)
ओमकार सुरेश गाजांळे ८९.% (तृतीय क्रमांक)
०००००००००००
वर्षभर अभ्यास करून विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहीत करणे यासाठी दरवर्षी गुणवंतांचा गुणगौरव केला जातो. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचा, गुरूजनांच्या परिश्रमाचा तितकाच वाटा असतो. गुणगौरव करण्यासोबत संबंधित विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या भावी वाटचालीस मार्गदर्शन करण्यावरही भर दिला जातो. त्यासोबत पुढील वाटचालीत त्यांची वाढणारी जबाबदारी याचीही जाणिव विद्यार्थ्याना करून देत असतो. विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यावर त्यांचा हुरूप वाढत असल्याने हे कार्यक्रम यापुढील काळातही राबविले जाणार आहेत.
:- गणेशदादा भगत
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ पश्चिम तालुकाध्यक्ष