• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 6, 2019

पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या मुजोर बँकांवर कारवाई करा!

adminbyadmin
in मुंबई
0
पराभव समोर दिसू लागल्याने मोदी फडणवीसांकडून जुमलेबाजी पार्ट -२ सुरुः खा. अशोक चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबई : खरीपासाठी पीक कर्ज देताना बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. नाहरकत प्रमाणपत्रासह इतर कागदपत्र पुर्ततेच्या नावाखाली शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जातो आहे. ऐन खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांची अशी अडवणूक करणाऱ्या मुजोर बँकांवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि त्यांना सुलभ पद्धतीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

पीककर्जाच्या वितरणासाठी बँका आडमुठी भूमिका घेत असल्याच्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने यासंदर्भात प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, खरिप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी तयारी करीत आहेत. बी-बियाणे, खतांच्या खरेदीसाठी पैशांची गरज असल्याने ते बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. पण बँकांकडून आवश्यकता नसताना आठ-दहा बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र आणण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागते आहे. दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडून शेतकरी खरीपाकडे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक करून बँकाच त्यांना सावकारांच्या दारात जाण्यास बाध्य करीत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

यंदाच्या खरीप हंगामासाठी ४३ हजार ८४४ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पण बँकांच्या उदासिनतेमुळे आतापर्यंत २५ टक्केही कर्जवाटप झालेले नाही. तर दुसरीकडे कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासही काही बँका टाळाटाळ करत असल्यानेही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. बँकांनी संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. पीक कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या व त्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांवर व संबंधित बँक अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे अशोक चव्हाण पुढे म्हणाले. पण राज्य सरकारकडून अशा मुजोर बँकांना इशारे देण्यापलिकडे काहीही ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही. किमान आतातरी सरकारने पीककर्ज वाटपात कुचराई करणाऱ्या आणि शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती दाखवावी, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

दरड कोसळल्याने तिलारी घाटातील रस्ता खचला

Next Post

बस नाल्यात कोसळून २९ जण ठार

Next Post
बस नाल्यात कोसळून २९ जण ठार

बस नाल्यात कोसळून २९ जण ठार

रिक्षा चालक संघटनांनी  मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप मागे

रिक्षा चालक संघटनांनी मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप मागे

सर्वच राज्यात कॉंग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग असताना महाराष्ट्रातच आऊटगोईंग कशी?

मनसेला आघाडीसोबत घेण्यास काँग्रेस अनुकूल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com