नवी मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती, इतर योजना या माध्यमातून नवी मुंबई महापालिका प्रशासन दरवर्षी वेगवेगळया जनकल्याणकारी योजना राबविते. प्रसिध्दीअभावी या योजना अनेकदा नगरसेवक कार्यालयापुरत्या अथवा नगरसेवकांच्या ओळखीच्या कुटूंबापर्यत सिमित असायच्या. मात्र प्रभाग 96च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत या अपवाद ठरल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या जनकल्याणकारी योजनांची 5000 पत्रके काढून प्रभाग 96 व 97 मध्ये घरोघरी वितरीत करण्यास सुरूवात केली आहेे.
2015 साली महापालिका सभागृहात आल्यावर नगरसेविका रूपाली किसमत भगत यांनी महापालिकेच्या योजना जाणून घेतल्या. या योजना त्यांनी स्वत:च्या कार्यालयापुरत्या अथवा पक्षाच्या कार्यकर्त्यापुरत्याच मर्यादीत न ठेवता स्वखर्चाने त्या योजनांची 5 ते 6 हजार पत्रके काढून आपल्या व शेजारच्या 97 या प्रभागातही वितरीत केली. महापालिकेच्या जनकल्याणकारी योजना या नवी मुंबईकरांसाठी आहे, त्याची माहिती त्यांना मिळालीच पाहिजे. करदात्या नागरिकांना योजनांचा लाभ हा भेटलाच पाहिजे अशी भूमिका घेत नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी घरोघरी स्वखचार्र्ने प्रसिध्दीपत्रके छापून वितरीत केली.
गेली 5 वर्षे त्या हा उपक्रम राबवित असूून घरोघरी स्वखर्चाने जनजागृती करत आहेत. पूर्वीच्या तुलनेत महापालिकेच्या योजनांचे लाभार्थी नेरूळ सेक्टर 16, 16ए, 18, 18 ए व 24 परिसरातून वाढलेे असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडूनही देण्यात येत आहे. अनेक नगरसेविकां व नगरसेवकांच्या कार्यालयापुरतीच सिमित राहीलेल्या जनकल्याणकारी योजना नगरसेविका रूपाली भगत यांच्या जनजागृतीच्या उपक्रमातून घराघरात पोहोचल्या असल्याची प्रतिक्रिया नेरूळ पश्चिमला घराघरात चर्चिली जात आहे.