नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पहिली ते पदवीपर्यतच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात येत असते. यावर्षी उत्पन्नाच्या दाखला मिळण्यास येणाऱ्या अडचणी पाहून शिष्यवृत्ती अर्ज भरंण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी भाजपच्या प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी पालिका प्रशासनाकडे व महापौर जयवंत सुतारांकडे पाठपुरावा केला. या प्रयत्नास यश येवून नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास १५ दिवसाची मुदतवाढ दिली आहे.
महापालिका प्रशासनाकडून शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२० होती. तथापि नेरूळ नोडमध्ये असंख्य पालकांना शासनाकडून उत्पन्नाचा दाखला न मिळाल्याने त्यांनी आपली व्यथा नगरसेविका रूपाली भगत यांच्याकडे मांडली. असंख्य विद्यार्थी शिष्यवृत्ति योजनेपासून वंचित राहणार असल्याचे निदर्शनास आल्यावर नगरसेविका रूपाली भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करत शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी केली. नगरसेविका रूपाली भगत यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. अखेरिला नगरसेविका रूपाली भगत यांच्या सततच्या पाठपुराव्याची दखल घेत पालिका प्रशासनाने १५ फेब्रुवारी २०२० पर्यतच मुदतवाढ दिली आहे. नेरूळ नोडमधील जनतेकडून शिष्यवृत्ती मुदतवाढीविषयी नगरसेविका रूपाली भगत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.