गरीब व गरजू रुग्णांनी जायचे कुठे?राष्ट्रवादीच्या सलीम बेग यांचा सवाल
नवी मुंबई : उच्च दर्जाची आरोग्य सेवा गजू व अर्थिक दुर्बल घटकांना मिळेल.म्हणून एका वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या कंपनीला मनपाच्या वतीने रुग्णालय सुरू करण्यास परवानगी दिली.पण त्याच रुग्णालयात आता कोरोना महामारीत एखाद्या गरीब व गरजू गंभीर कोव्हिडं रूग्णाला विनामूल्य सेवा देण्यासाठी कोटा नसल्याने गरीब व गरजू रुग्णांनी जायचे कुठे? असा सवाल विचारून वाशी माधील फोरटीज रुग्णालयात दहा टक्के बेडस कोटा कोरोना बाधितांसाठी ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे संघटक सलीम बेग यांनी केली आहे.
साधारणतः दहा वर्ष्यापूर्वी वाशी येथील मनपाच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील अर्धी इमारत फोरटीज रुग्णायला कमीत कमी भाडे तत्वावर दिली.फोरटीज रुग्णालयाला इमारत देताना दहा टक्के खाटा ह्या नवी मुंबई मनपाच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना राखीव ठेवणे व विनामूल्य उपचार करणे हे देण्याचे करार करण्यात आले.त्यानंतर किती कोणत्या गरीब व आर्थिक दुर्बल नागरिकांनी याचा फायदा घेतला.हा विषय संशोधनाचा असला तरी दहा टक्के खाटा ह्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या.परंतु आता त्या राखीव बेडस कोरोना बाधितांसाठी ठेवल्या नसल्याची माहिती एका मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या अकरा हजार पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.मनपाकडून निर्माण करण्यात आलेल्या कोव्हिडं रुग्णालयात उच्च दर्जाच्या सुविधा नाहीत.त्यामुळे कोरोना महामारीत नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना या रुग्णालयाची गरज अत्यावश्यक होती.पण इतर आजरा साठी दहा टक्के राखीव असणाऱ्या बेडस कोरोना बधितांना मिळत नसल्याने गंभीर व अतिगंभीर रुग्ण सर्वसामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.विशेष म्हणजे सुपरस्पेशालीटी उपचार न मिळाल्या कारणाने अनेक आर्थिक दुर्बल रुग्णांचा बळी देखील गेला आहे गेला असल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे संघटक सलीम बेग यांनी सांगितले.
याबाबत मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांना विचारले असता,आयुक्तां बरोबर विचार विनिमय करून पुढील निर्णय घेऊ असे सांगितले.