
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
मुंबई : अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठाणे येथे वाढत्या बेरोजगारीविरोधात निदर्शने केली व युवकांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
पंतप्रधान मोदी यांच्या नोटबंदी सारख्या लहरी निर्णयामुळे व जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मंदीत येऊन बेरोजगारी वाढली होतीच. त्यात नियोजनशून्य लॉकडाऊनमुळे करोडो लोकांचे रोजगार गेले असुन बेरोजगारीचे मोठे संकट समोर उभे राहिले आहे. अशा काळात युवकांची रोजगाराविषयी लक्षात घेऊन तात्काळ रोजगार निर्मिती करावी, यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस ‘रोजगार दो’ हे आंदोलन घेत आहे.
कोरोनाकाळात देखील केंद्र सरकार बिगरभाजप शासित राज्यांची आर्थिक कोंडी करण्यात धन्यता मानत आहे. यामुळे बिगरभाजप शासित राज्यांना कारभार चालवणे मुश्किल होऊन बसले आहे.अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून करोडो लोक बेरोजगार झाले आहेत.नवीन रोजगार काढायचे तर दूरच राहिले पण सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे, असा आरोप यावेळी तांबे यांनी केला.
युवकांना रोजगार हवेत,आणि त्याबद्दलच चर्चा झाली पाहिजे पण वाढलेल्या बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी मोदी सरकार नको तिकडे जनतेला भरकटवून ठेवत आहे, अशी खरमरीत टीका यावेळी तांबे यांनी केली.