
उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी केले नेतृत्व
नवी मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात नवी मुंबई परिसरातील रस्त्यांचे खड्ड्यां मध्ये रूपांतर होते.या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव जाते.तसेच खड्ड्यांमुळे वाहांनाचा नुकसान होते.म्हणून रस्ते चकचकीत असावेत व काळजी घ्यावी म्हणून मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली येथील पटनी मार्गावर रेड्याचे बॅनर व एक तरुणाला यमाचे कपडे घालून आंदोलन करण्यात आले.
नवी मुंबई शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे.यामुळे दरदिनी व्यवसाय करणाऱ्या वाहन चालकांना वाहनांची दुरुस्ती नियमित निघत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.तसेच अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.सायन पनवेल महामार्गावर कोपरखैरणे येथील किरण गुजर या तरुणाचा अपघात होऊन अवयव निकामी झाले होते. तो तरुण आजही मृत्यूशी झुंज देत आहे.अश्या प्रकारचे अपघात नेहमीच होत असल्याने याला शासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी सांगितले.
करदाते बिचारे आपला कर भरत आहेत.त्यामुळे नागरी कामे होतात.परंतु प्रशासनाला काहीही सोयरसुतक नाही.याचाच उदाहरण म्हणजे नवी मुंबई मधील रस्त्यांची चालणं झाली आहे.त्यामुळे रस्त्यावरील ज्या घटना घडत आहेत.त्याला जबाबदार संबंधित शासकीय यंत्रणा आहे.त्यामुळे रस्त्यावर ज्या दुर्दैवी घटना घडल्या जातात .यास शासकीय यंत्रणा जबाबदार असून त्यांनीच नुकसानभरपाई द्यावी असेही पुढे निलेश बाणखेले यांनी सांगितले.त्यानंतर मनसेचे शिस्टमंडळाने ऐरोली विभाग अधिकारी व उपअभियंता अर्जुन बिराजदार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले,नितीन लष्कर,विश्वनाथ दळवी,भूषण आगीवले,प्रवीण घोगरे,सांतोष जाधव,संदीप सिंग,प्रेम दुबे,दशरथ सुरवसे,शुभांगी बंदीचौडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.