
संपर्क : ९८२००९६५७३ / Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन परिसरात महापालिका प्रशासनाकडून कोरोना चाचणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला असताना त्या ठिकाणी व सभोवतालच्या परिसरात मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) कॉंग्रेसच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले.
नेरूळ सेक्टर दोनमधील एलआयजी या श्रमिकांच्या वसाहतीमधील आम्रपाली सोसायटीमध्ये महापालिका प्रशासनाकडून अॅण्टीजेन व आरटीपीसीआर या दोन कोरोना चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी येणाऱ्या रहीवाशांना कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर व शेवंता मोरे यांच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी गजानन टाळे, बापू शिंदे उपस्थित होते.
घरातील महिलांनी कपड्यापासून तयार केलेले मास्क कोरोना चाचणी कार्यक्रमात तसेच सभोवतालच्या परिसरातही वाटण्यात आले. मास्क वाटपातून एलजीआयतील रहीवाशांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे मास्क उपयुक्त ठरतील व घरातील महिलांना कुटीरोद्योगाची संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी दिली. यावेळी स्थानिक रहीवाशांनी कॉंग्रेसच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी आम्रपाली असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. कोरोना चाचणी अभियान राबविण्याकरिता आम्रपालीच्या पदाधिकाऱ्यांनी व रहीवाशांनी मोलाचे सहकार्य केले.