
पनवेल : बँकिंग उद्योगातील बहुसंख्य असलेली संघटना ए.आय.बी.ई.ए.व अधिकाऱ्यांची संघटना ए.आय.बी.ओ.ए. संघटनेने 26 नोव्हेंबर रोजी एक दिवसाच्या संपाची हाक दिली.
बँकांचे खाजगीकरण करू नये, बँका सरकारी मालकीच्या असाव्यात, ठेवी वरील व्याज दर वाढवावेत, कृषी कर्ज शेतकऱ्यांना पुरविण्यात यावे, बुडीत कर्जांची तातडीने वसुली करावी, कामगार कायद्यामध्ये बदल करू नयेत, बँकांत कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात यावी, अशा बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारी शहरातील बँक व महाराष्ट्रच्या पनवेल शाखेसमोर संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली.
यावेळी संघटनेचे संघटन सचिव अरविंद मोरे यांनी संपाची रूपरेषा सांगितली व येत्या काळात अशीच एकजूट ठेवून आपण सर्वांनी राष्ट्रहितासाठी बँकेच्या सुविधा सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू या, असे सांगितले. यावेळी अस्मिता गुणे, सुनेत्रा परांजपे, आकाश शिरवईया, शैलजा ठकेकर, राजू म्हात्रे, प्रसाद मोहोकर, वेलणकर, शेडगे, सतिश पारधे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.