संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : मागील एक दशकाहून अधिक कालावधीपासून नवी मुंबईच्या राजकारणात सुरज बाळाराम पाटील या युवकाला कुकशेतच्या ढाण्या वाघ या नावाने संबोधले जात आहे. सतत कुकशेतच्या विकासाच्या ध्यास घेवून एमआयडीसी, नवी महापालिका, मंत्रालय आदी प्रशासन दरबारी सातत्याने धडका देणाऱ्या सुरज बाळाराम पाटील या युवकाने पुन्हा एकवार कुकशेतच्या ग्रामस्थांच्या न्याय्य हक्कासाठी हर्डिलिया कंपनीच्या प्रवेशद्वारावर शिवजयंतीपासून १९ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. उपोषणाचा तिसरा दिवस संपत आला तरी कुकशेतच्या ग्रामस्थांना न्याय मिळवून दिल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करत सुरज पाटील यांनी कुकशेत गावाशिवाय व कुकशेतच्या ग्रामस्थांशिवाय आपल्याला आपल्या जीवाची पर्वा नाही हे कृतीतून दाखविण्यास सुरूवात केल्याने ‘कुकशेतचा ढाण्या वाघ’ ही उपाधी सार्थ ठरविली आहे.
- कुकशेत गावातील ग्रामस्थांनी एमआयडीसीला शेतजमिनी दिल्या आणि त्या मोबदल्यात ज्या ग्रामस्थांना नोकरीत समाविष्ट करण्यात आले. आज ते सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांच्या वारसास (घरातील व्यक्तिस) नोकरीत समाविष्ट करून घ्यावे. २) संदीप हेमंत पाटील या युवकाला दिलेल्या लेखी आश्वासनाची त्वरित पूर्तता करण्यात यावी. ३) ज्या ग्रामस्थांची अजून ट्रेनी म्हणून वेळ वाढवून ठेवली आहे, त्यांना त्वरित कायम स्वरूपी कामगार म्हणून रूजू करून घ्यावेत. ४) मंदिर व इतर पुर्नवसित गावातील विषयांमध्ये कंपनीने स्वत:ची जबाबदारी स्विकारावी. ५) कुकशेत गावाच्या संपादित जमिनीवर कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पात कुकशेतच्या ग्रामस्थांनाच नोकरीमध्ये समाविष्ट करण्याचा लेखी करारनामा करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी सुरज पाटील यांनी शुक्रवारपासून , दि. १९ फेब्रुवारीपासून हर्डिलिया कंपनीच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांच्यासह नवी मुंबईतील अन्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी, माजी नगरसेवकांनी , विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देत सुरज पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.