संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मनसेसुप्रिमो राज ठाकरेंच्या आदेशानुसार मनसेचे नेते अमित ठाकरे व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन_काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात चिपळूण, खेड, महाड, येथे काही दिवसांपूर्वी महापूर आला होता मानवतेच्या दुष्टीने चिपळूण येथील लोकांना मनसे दिघा/ऐरोली, नवी मुंबई पथकाने माळेवाडी, पवार चाळ,कळंबस्ते, खेर्डी येथे जाऊन लोकांना घरोघरी जाऊन मदत केली.
यामध्ये प्रामुख्याने अन्न धान्यासहीत साबण, चादर, टॉवेल, चटई, महिलांना गाऊन, महिला व लहान मुलांना अंतर्वस्त्रे, बिस्कीट, स्टील चे ग्लास, पाणी तसेच मुक्या प्राण्याचे खाद्य याचा समावेश होता.
यावेळी मनसेचे नवी मुंबई शहर सचिव रूपेश कदम यांच्यासमवेत शाखा अध्यक्ष रविंद्र सोडे, रस्ते आस्थापना संघटक अजित दावणे, किशोर पाईकराव,शाखा अध्यक्ष अक्षय सावंत, नामदेव भाकरे, अजय कांबळे, सुवर्णा परब, उपशाखा अध्यक्ष राजेंद्र धाडवे, बालाजी गोडावले, गट अध्यक्ष गणपत धाडवे, दिपक धाडवे, प्रथम गोडावले, अमोल कदम, अमित बाटले, भरत धाडवे, अरविंद कासेकर, भास्कर चव्हाण, अनिकेत हल्लाळे उपस्थित होते.