स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारी नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नामुळे आटोक्यात येत चालली असून मंगळवारी (दि. २८ सप्टेंबर) कोरोनाचे नवे ६३ रूग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही, ही नवी मुंबईकरांना दिलासा देणारी बाब ठरली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या ६५ रूग्णांना आज डिसचॉर्ज देण्यात आला आहे.
आज आढळून आलेल्या ६३ रूग्णांमध्ये बेलापुर विभागात १५, नेरूळ विभागात १०, वाशी विभागात ६, तुर्भे विभागात ४, कोपरखैराणे विभागात १२, घणसोली विभागात ३, ऐरोली विभागात १० तर दिघा विभागातील ३ रूग्णांचा समावेश आहे. ५ हजार ५२६ जणांनी आज नवी मुंबईत स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. वाशी एक्झिबिशन सेंटरमधधील कोव्हिड रूग्णालयात १४९ जण तर अन्य ठिकाणी ४० जण कोरोना आजारावर उपचार घेत आहेत. ३२६ जण होम आयसोलेशन होवून कोरोनावर उपचार घेत आहेत.