स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडे प्रभागात ब्लिचिंग पावडर फवारणी आणि धुरीकरणासाठी सातत्याने लेखी पाठपुरावा करूनही महापालिका प्र्रशासन उदासिनता दाखवित असल्याने प्रभाग ७६ मधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी गेल्या १५ दिवसापासून प्रभागामध्ये स्वखर्चातून धुरीकरण आणि ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे अभियान सुरू केले आहे.
दोन दिवसामध्ये पांडुरंग आमले व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेलापूरच्या आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्रमांक ७६ मधील सुयोग रेसिडेन्सी १ व २ सिद्धिविनायक, प्रियांका, स्वस्तिक ,छाया, शिवसागर, शिवपार्वती, हिमगिरी, गुरुकृपा, स्नेहबंधन या सोसायटीमध्ये तसेच सोसायटी बाहेरील परिसरात ब्लिचिंग पावडरची फवारणी केली. रहीवाशी सांगतील तेथे पांडुरंग आमलेंकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात येत आहे. याशिवाय सोसायटी बाहेरील परिसर, पदपथ सर्वत्र रहीवाशांच्या मागणीस्तव पांडुरंग आमले यांनी ब्लिचिंग पावडरची फवारणी केली. याशिवाय रहीवाशांकडून डासांची तक्रार होताच त्यांनी धुरीकरण अभियानही सुरू केले आहे. महापालिका धुरीकरण व ब्लिचिंग पावडर फवारणीत उदासिनता दाखवित असताना भाजपाचा पांडुरंग आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मदतीला धावून आला असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.