महापालिका प्रतिनिधी : मनिष चव्हाण : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदास दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करणेबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख यांस निर्देश दिले आहेत.
त्यासोबतच महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत कंत्राटी कामगार तसेच ठेकेदाराकडील कर्मचारी यांचीही दिवाळी आनंदात जावी यादृष्टीने आयुक्तांनी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता विहित मुदतीत बोनस व रजा रोखीकरण रक्कम तसेच ऑक्टोबर महिन्याचे मासिक वेतन २८ ऑक्टोबरपूर्वी अदा करणेबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
सदर आदेशान्वये सर्व कंत्राटी कामगार व ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांना २ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दिवाळीआधीच बोनस व रजा रोखीकरण रक्कम तसेच ऑक्टोबर महिन्याचे मासिक वेतन मिळणार असल्याने त्यांच्यामार्फत आनंद व्यक्त केला जात आहे.