नवी मुंबई महापालिका प्रतिनिधी : मनिष चव्हाण : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १६ मधील गटारांची तळापासून सफाई करून त्यात तुंबलेला कचरा, माती काढण्याची लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ४२ मधील कोपरखैरणे सेक्टर १६ मधील गटारांमध्ये कचरा तुंबलेला असल्याने पाणी चोकअप होण्याचे, दुर्गंधी पर्यायाने साथीच्या आजाराचे रूग्ण सापडल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. कोपरखैरणे सेक्टर १६ मध्ये रामदेव मेडिकच्या गल्लीजवळील गटाराची पाहणी केल्यास आपणास समस्येचे गांभीर्य समजून येईल. ही गटरे पूर्णपणे तुंबलेली आहेत. या गटाराजवळून ये-जा करताना तसेच सभोवतालच्या रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे डासही वाढीस लागले आहेत. या गटारांमध्ये कचरा तसेच माती साचली असल्याने पाणीही पुढे जात नाही. या ठिकाणी डेंग्यूचे रूग्ण आढळून येवू लागले आहेत. या गटारांची स्वच्छता व सफाई झाल्यास दुर्गंधीची व डासांची समस्या संपुष्ठात येईल. गटरे चोकअप झाल्याने रहीवाशी त्रस्त झाले आहेत. या गटारांची तळापासून सफाई करताना त्यातील चोकअप व माती काढून टाकण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.