माजी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
आबा एसीपी : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मधील भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिरासह रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
रविवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयोजनाखाली नवी मुंबई ब्लड सेंटर, खारघर-नवी मुंबई यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली असल्याची माहिती अशोक गांडाळ यांनी दिली. वाढदिवसनिमित्ताने रविवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत नेरूळ सेक्टर १६ मधील सनशाईन हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात बीपी चेकअप, जनरल चेकअप, शुगर चेकअप, दंत तपासणी,ई.सी.जी शुगर गरजेनुसार, उंची व वजन तपासणी, स्त्री रोग तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबीरासाठी डॉ. इमानदार, डॉ. निलोफर येरूळकर, डॉ. अर्चना निलेश भोंगे यांनी मार्गदर्शन केले. १०५ लोकांनी आरोग्य शिबिरात सहभागी होत स्वत:ची आरोग्य तपासणी करून घेतली. शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे व आरोग्य तपासणी करून घेणाऱ्या रहीवाशांचे समाजसेवक व पर्यावरणप्रेमी रवींद्र भगत यांनी आभार मानले.