निलेश मोरे : ९७५७३८११००
मुंबई : शिवसेनेच्या माध्यमातून वाहतूक चालक व मालकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या कार्यालयाचे उदघाटन गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य महासचिव इंद्रपाल सिंग मारवा ( सत्ती ) यांचे सायन कोळीवाडा येथील महाराष्ट्र कमिटी कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र अध्यक्ष इंद्रजित सिंग बल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इंद्रजित सिंग बल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की अवजड वाहतूक दारांचा मोठा प्रश्न डिझेलची वाढती किम्मत आहे ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून केंद्राकडे जीएसटी ची कतोटी करण्याची मागणी केली आहे.
अवजड वाहतूक दार मालक चालक यांचे विविध प्रश्न असतात त्यांना शिवसेनेच्या संघटनेवर विश्वास आहे. आता या कार्यालयातून वाहतुकदारांच्या समस्या सोडवल्या जाणार असल्याचे महासचिव इंद्रपाल सिंग मारवा यांनी सांगितले. दरम्यान कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात विभाग प्रमुख मंगेश सातमकर यांनी उपस्थित राहून इंद्रपाल मारवा यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे सदस्य उपस्थित होते.