संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पावसाळ्यात येणाऱ्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कोपरखैराणे नोडमधील प्रभाग ४२ मध्ये जनजागृती अभियान राबविण्याची लेखी मागणी समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोपरखैराणे नोडमधील प्रभाग ४२ मध्ये सानपाडा सेक्टर २२, २३, १६ आणि १७ चा काही भाग या परिसराचा समावेश होत आहे. आता अवघ्या २२-२३ दिवसावर पावसाळा येवून ठेपलेला आहे. नवी मुंबईत पावसाळा कालावधीत ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजारांचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. अर्थात कोपरखैराणे परिसरही त्यास अपवाद नाही. या प्रभागाच्या बाजूलाच खाडीकिनारा आहे. डासांची उत्पत्ती व डासांचा त्रासही मोठ्या प्रमाणावर स्थानिक रहीवाशांना सहन करावा लागतो. मलेरियाचे रूग्ण बाराही महिने प्रभागात पहावयास मिळतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाने साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ४२ मधील रहीवाशांसाठी जनजागृतीपर व्यापक प्रमाणावर जनजागृती अभियान राबविणे आवश्यक आहे. साथीचे आजार होवू नये म्हणून घ्यावयाची उपाययोजना, पाणी साचून न ठेवणे, अडगळीच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे, स्वच्छतेला प्राधान्य देणे तसेच अन्य उपाययोजनांविषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रभाग ४२ मधील जनतेला माहिती अवगत करून देणे आवश्यक आहे. काही दिवसावर आलेला पावसाळा पाहता प्रभाग ४२ मध्ये जनजागृती अभियान राबविण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
0000000000000000000000 0000000000000000000000000000000000
नवी मुंबई लाईव्ह.कॉमचे कार्यालय : गोदावरी सोसायटी, शॉप क्रं २, प्लॉट ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प), नवी मुंबई, संपर्क : ८३६९९२४६४६