नवी मुंबई : नवीन पुनर्रचनेतील महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील डागडूजी करताना खड्डे युध्दपातळीवर बुजविण्याची मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे. त्यातील कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर सहा हा खाडीकिनाऱ्यालाच (मधला पामबीच मार्ग सोडला तर) लागून असलेला परिसर आहे. प्रभाग ३४ मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यांच्या पाहणी अभियानाविषयी पालिका प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आजही प्रभाग ३४ मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावर कुठे छोटे तर कुठे खड्डे दिसून येत आहे. काही ठिकाणी रस्त्यावर असलेल्या मल:निस्सारण वाहिन्यांच्या झाकणालगतचा भाग खचलेला दिसून येत आहे. या ठिकाणी पाणी साचलेले असते. पावणे दोन महिन्वयाच्या पावसाळा कालावधीत प्रभाग ३४ मधील मुख्य रस्त्यावर तसेच अंर्तगत रस्त्यावर खड्डे वाढू लागले आहे. डांबर पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. विशेषत: अंर्तगत रस्त्यावर फिरल्यास रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्यासभोवताली खड्डे वाढू लागले आहेत. अजून जवळपास सव्वा महीना पावसाळा बाकी आहे. या कालावधीत हे खड्डे वाढण्याची शक्यता आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने तेथून वाहने जाताना सभोवतालच्या पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडते. काही खोलगट भागातील खड्डयांमुळे दुचाकी घसरण्याची भीती आहे. साचलेल्या पाण्याचा खड्डयामुळे अंदाज न आल्यास तेथून जाणाऱ्या रहीवाशांचा त्या ठिकाणी पाय पडून शारीरीक इजा होण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता प्रभाग ३४ मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यांची पाहणी करून तेथे असणारे छोटे मोठे खड्डे बुजविण्याबाबत पालिका प्रशासनातील संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात केली आहे. संदीप खांडगेपाटील यांनी २४ जुन २०२२ रोजी प्रभाग ३४ मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासनाला निवेदन सादर केले होते.