स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत मूषक नियत्रंण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले दोन टप्प्यातील कोव्हिड भत्ता तात्काळ देण्याविषयी नवी मुंबई महापालिकेला आदेश देण्याची मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोव्हिड काळात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता दिलेला आहे. अपवाद म्हणजे कोरोना महामारीची लाट ओसरल्यावरही मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेला नव्हता. याविषयी महापालिका प्रशासन व राज्य सरकारकडे मी सातत्याने पाठपुरावा केल्यावर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोव्हिडचा पहिल्या टप्प्यातील कोव्हिड भत्ता दिला आहे. अजून दोन टप्प्यातील कोव्हिड भत्ता बाकी आहे. महापालिका प्रशासनाने थकीत असलेला दोन टप्प्यातील कोव्हिड भत्ता तात्काळ द्यावा यासाठी आपण महापालिका प्रशासनाला आदेश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.