सोमनाथ वासकर व कोमल वासकर यांच्या संकल्पनेतून उतरली रोबोटिक्स लॅब
नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नगरसेवक सोमनाथ वासकर व नगरसेविका कोमल वासकर यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ब्लिक्स रोबोटिक्स क्लासरूमचे उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रम दत्त स्कूल सानपाडा येथे आयोजित करण्यात आला. यावेळी ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे व शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्याचे कौतुक करत या दोघांनी वासकर दांपत्याच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
हा कार्यक्रम नगरसेवक सोमनाथ वास्कर व नगरसेविका कोमल सोमनाथ वास्कर यांच्या पुढाकाराने नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक १८ च्या आवारात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटपसुद्धा करण्यात आले. स्व. सिताराम मास्तर सानपाडा सेक्टर ७ येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या सर्वांसाठी अल्पोपहारही देण्यात आले. ब्लिक्स रोबोटिक्स स्टीम क्लासरूम हे नवी मुंबई तील प्रथम अशी शाळा आहे, जिथे विद्यार्थ्यांना आवड निर्माण होऊन तंत्रज्ञानात गोडी निर्माण होईल. या उद्घाटन सोहळ्यात शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सौ. अरुणा यादव (शिक्षणाधिकारी), नगरसेवक सोमनाथ वास्कर व नगरसेविका कोमल सोमनाथ वास्कर, शिवसेना विभागप्रमुख महेश बनकर, आशिष वास्कर, घनश्याम पाटे, उपविभागप्रमुख गणेश मानकर, संजय पाटील, शाखाप्रमुख रणधीर सुर्वे, सुरेश कदम, शिवसेना महिला आघाड़ी डॉ. आशालता गोंधले, सौ. स्मिता धमामे, सौ. सुरेखा गव्हाणे, सौ. कविता ठाकुर आणि सौ. सुलभा केसरकर श्रीमती प्रतिभा पांचाळ मुख्याध्यापक शाळा क्रमांक १८ सानपाडा, श्री.मंगल भोईर मुख्याध्यापक माध्यमिक शाळा क्रमांक ११६, सानपाडा, झेफायर टॉय मेकरचे संस्थापक जाहीर गबाजीवाला आणि अब्बास गबाजीवाला, प्रमोद कांबळे, शिक्षक वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.