नवी मुंबई : नवीन पुर्नरचनेतील प्रभाग ३६ मधील जुन्या पुनर्रचनेतील प्रभाग ९६-९७ येथील नेरूळ सेक्टर १६,१६ए,१८,१८ए, २४ परिसरात दहावी-बारावीच्या परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जनसेवक गणेश भगत, माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत, भाजपचे नेरूळ मंडळ अध्यक्ष राजू तिकोणे, समाजसेविका उल्का तिकोणे यांच्या माध्यमातून घरोघरी जावून सत्कार करण्यात येत आहे.
प्रभाग ९६ मध्ये दहावीच्या परिक्षेत स्वप्निल सुनिल भाबल ९७ टक्के, दिक्षा पांडुरंग सरवणकर ९३.४० टक्के, सृष्टी विजयकुमार शिंदे ९२.४० टक्के या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देताना पुढील शैक्षणिक वाटचालीमध्ये तुम्हाला जे जे सहकार्य लागेल, ते सर्व उपलब्ध करून दिले जाईल, तुम्ही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा असे समाजसेवक गणेश भगत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.
या अभियानात समाजसेवक गणेश भगत, माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत, भाजपचे नेरूळ मंडळ अध्यक्ष राजू तिकोणे, समाजसेविका उल्का तिकोणे यांच्याबरोबर दिलीप राऊत, वासुदेव पाटील, प्रदीप कलशेट्टी, सुनील वायकर, सौ. विमल गाडांळ, अनिल पवार, आनंद पवार, शरद भोर, राजेंद्र तुरे, संतोष शिंदे, संपत तोडकर, अमित पवार, बाळासाहेब आंधळे, सागर मोहिते, अशोक गांडाळ, मयुर पवार, प्रतिक पाटोळे, राजेश घाडी, सुभम पाटणकर. दत्तात्रेय पाडेकर, सुभाष घाडी, अरूण देसाई, तुकाराम प्रभु, शैलेश कात्रे, गणेश डोंगरे, सचिन अहिर, किरण अधिकारी, सुधीर भगत, किरण देसाई, अक्षय शिरगावकर, सागर जोगदिया, दादासाहेब पवार, संतोष बारवे, श्रीकांत इंगवले, यादवसाहेब, भोसलेकाका आदी सहभागी झाले होते.