मुंबई : राज्यात विदर्भ व मराठवाड्यात अतिवृष्टीने १० लाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. शेतातील पिके वाया गेली आहेत तसेच घरांची पडझडही झाली आहे. पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांच्या गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचा पाहणी दौरा करणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे नवी मुंबईतील नेते रविंद्र सावंत यांनी दिली.
२९ जुलै रोजी सकाळी नागपूरहून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गडचिरोली जिल्ह्याकडे प्रयाण करतील. चार्मोशी व अहेरी तालुक्यातील शेत व शेतपिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पूरस्थितीबाबत चर्चा करतील. ३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याला भेट देतील. राजुरा विधानसभा क्षेत्रातील पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करतील व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी पूरस्थितीबाबत चर्चा करतील. गडचिरोली व चंद्रपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रसार माध्यमांशी संवाद साधतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर वर्धा कडे रवाना होतील व वर्धा येथून सेवाग्राम एक्सप्रेसने नाशिककडे रवाना होतील.