नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ मा. तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी नेरूळ सेक्टर सहा परिसरात आयोजित केलेल्या आधार कार्ड शिबिरास स्थानिक रहीवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ७ ते १३ नोव्हेंबरदरम्यान आयोजित केले होते. परंतु जनतेच्या आग्रहास्तव महादेव पवार यांनी १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान या शिबिराची मुदत वाढविली आहे.
या शिबिरात नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डवरील मोबाईल नंबर दुरुस्ती, आधारकार्डवरील पत्त्यात बदल, केवायसी आदी कामे करण्यात येत असून सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत ही कामे करण्यात येत आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महादेव पवार यांच्यासह यशवंत मोहिते, प्रमोद शेळके, रोहिदास हाडवळे, रविंद्र सुर्वे, राजेंद्र कोरडे, रोहन वाघ आदी परिश्रम करत आहेत. आमदार शशिकांत शिंदे व प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागामध्ये सातत्याने लोकोपयोगी कामांचे आयोजन करत असल्याची माहिती महादेव पवार यांनी दिली.