अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘परिक्षा पे चर्चा २०२३’ हे अभियान सानपाडा येथील विवेकानंद हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडले.शुक्रवारी सकाळी ११ ते १२च्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थी व पालकांशी सुसंवाद साधला. स्वामी विवेकानंद संकुल, सानपाडा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील ७५० हून अधिक विद्यार्थी या अभियानात थेट सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेमध्ये भाजपच्या बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, महाराष्ट्र प्रदेश आयटीसेलचे अध्यक्ष सतीश निकम, भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, भाजयुमोच्या युवती नवी मुंबई अध्यक्षा सुहासिनी नायडू, भाजपचे नवी मुंबई महामंत्री विजय घाटे, भाजपचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आबा जगताप, भाजप महिला मंडळाच्या सानपाडा-जुईनगर अध्यक्षा आज्ञा गव्हाणे, भाजयुमोचे नवी मुंबई महामंत्री हरेश पांण्डे, भाजयुमोचे नवी मुंबई महामंत्री संदीप कारंडे, शाळेचे मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक सुधीर जोशी, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका रश्मी विघ्ने आदी उपस्थित होते.
भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्रेया सोलापुरकर यांनी प्रस्तावनेत उपस्थितांचा परिचय करून देताना कार्यक्रमाची रुपरेषा सादर केली तर रिटा सोनी यांनी उपस्थितांचे आभार मानले. भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रथमच या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करताना पांडुरग आमले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.