अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २४ येथील सार्वजनिक उद्यानात ओपन जीम बनविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
जुईनगर सेक्टर २४ येथे महापालिकेचे सार्वजनिक उद्यान आहे. या उद्यानासभोवताली सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. काही साडे बारा टक्के भुखंडावरील सोसायट्याही आहेत. काही अंतरावर गावही आहे. खासगी व्यायामशाळांच्या महागड्या फी असल्याने येथील सिडको सदनिकाधारकांना, साडे बारा टक्केमधील रहीवाशांना, जवळच्या ग्रामस्थांना, त्यांच्या मुलांना या खर्चिक व्यायामशाळा परवडत नाही. महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबई शहरामध्ये सर्वत्रच पालिका उद्यानामध्ये ओपन जीमची निर्मिती करून त्या ठिकाणी व्यायामाचे साहित्यही उपलब्ध करून दिलेले आहे. या ठिकाणी अल्प उत्पन्न ते मध्य उत्पन्न गटातील तसेच सभोवतालच्या परिसरातील सर्वच रहीवाशी ओपन जीममध्ये व्यायाम करताना पहावयास मिळतात. आपण महापालिका सेक्टर २४ मधील महापालिकेच्या उद्यानामध्ये ओपन जीमची निर्मिती करून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी निवेदनात केली आहे.