नवी मुंबई : भूसंपादन झालेले नसताना झुंडशाहीच्या जोरावर पोलिसी पाठबळावर दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतात सुरू असलेल्या २६ गुंठे जागेवर अतिक्रमण करून डागडूजी करणाऱ्या कामाची चौकशी होणेबाबत तसेच या कामास मुदतवाढ नसतानाही काम झुंडशाहीच्या बळावर काम रेटून नेणाऱ्या ठेकेदाराचा जेसीपी जप्त करून ठेकेदार, त्याचा सुपरवायझर जगदाळे आणि ग्रामपंचायत सदस्य व सरपंचावर गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव- जुन्नर रोडवरील उत्तम विष्णू खांडगे (वय वर्ष ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्ष ७१) या दोन वयोवृद्ध शेतकऱ्यांची पाच एकर जमिन आहे. या जमिनीतील तब्बल २६ गुंठे जागेवर भूसंपादन न करता या वयोवृद्ध शेतकऱ्यांना एक पैशाचाही मोबदला न देता गावपुढारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी आणि त्यांना पडद्यामागून मंत्रालयीन ओळख वापरून दडपशाही करू पाहणारे काही ग्रामस्थ २६ गुंठे जागेबर न्यायालयात प्रकरण असतानाही दडपशाही, पोलिसी बळावर पुन्हा त्या रस्त्यावर डांबरीकरण करणे सुरू केले आहे. मुळातच कोणतीही लेखी पूर्वसूचना या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या मालकीहक्काच्या शेतातून (अद्यापि भूसंपादन झालेले नसताना व सरकारकडून वयोवृद्ध शेतकऱ्यांना एक पैशाचीही नुकसान भरपाई न मिळता) मंगळवारी, दि. ३० मे रोजी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि जिल्हा परिषद अधिकारी यांनी पोलीसी बळावर पुन्हा एकदा झुंडशाहीचा आधार घेत रस्त्याचे काम सुरू केले. विजयाचा जल्लोष करत फोटोसेशन करत आनंदोत्सव साजरा केला. आमच्याच जमिनीत उभे राहून हे प्रकार सरपंच व ग्रामपंचायत सदस्य हा प्रकार करत होते. काम सुरू झाले मंगळवारी, दि. ३० मे रोजी आणि कामाचा माहिती फलक लावला जातोय २ जुन रोजी सकाळी ११ वाजता म्हणजे काम सुरू झाल्यावर चौथ्या दिवशी फलक लावण्यात आला असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
या कामाची मुदत कधीच संपुष्ठात आली आहे. काम सुरू होण्यापूर्वी माहितीफलक लावणे आवश्यक होते. माहितीफलकावर कामाचा कालावधीचा कधीपासून कधीपर्यत याचा कोठेही उल्लेख नाही. आम्ही ठेकेदार वामन व त्यांचे सुपरवायझर जगदाळे यांच्याकडे तुम्ही काम करताय, त्याची टेंडरची कागद दाखवा याची हजारवेळा मागणी केली असता ठेकेदार वामन यांनी आरटीआय टाका अशी उर्मटपणाची उत्तरे दिली आहेत. माझी व ठेकेदार वामन यांची पोलिसी चौकशी करून अहवाल मागवा. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. ठेकेदार वामन माझ्यावर पोलिसांसमोर अरेरावी करत होता. हे अतिक्रमण असून कागदोपत्री परवानगी नसतानाही काम करत असल्याने जेसीपी जप्त होईल हे मी जीव तोडून सांगत होतो. फलकाचा व मदतवाढीसाठी केलेला अर्ज मी आपल्या माहितीस्तव सादर करत आहोत. याप्रकरणी न्यायालयात सुनावनी सुरू असून जुलै महिन्याची तारीख पडलेली आहे. गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य प्रसिद्धीमाध्यमांना खांडगे कंपनी केस हारली आहे. आम्ही केस जिंकलो आहोत अशा मुलाखती देत दिशाभूल करत माननीय न्यायालयालाही जुमानत नसल्याचे दिसून आले असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
या कामाची चौकशी व्हावी. टेंडरची चौकशी व्हावी. हे काम मुदतीत होत आहे का ते पहावे. मुदतवाढ मिळालेली नसतानाही अतिक्रमणावर ठेकेदार काम करत असेल तर ठेकेदार वामन व सुपरवायझर जगदाळे यांच्याकडे गुन्हा दाखल करून शिक्षा करावी आणि जेसीपी जप्त करावा, जेसीपी क्रमांकही आमच्याकडे आहे. तसेच न्यायालयीन सुनवाणीचीही माहिती मागवावी. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना खांडगे कंपनी केस हारली व आम्ही जिंकलो असे सांगणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे. मुदतवाढ मिळालेली नसतानाही काम करणाऱ्या ठेकेदार व सुपरवायझवर आणि सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करावी. आम्ही न्यायासाठी भांडतोय, जसे कागद मिळतील तसे आपणाकडे व न्यायालयाकडे सादर करतोय. आपण स्वत: शेतकरी आहात. आमचे दु:ख जाणू शकता.माझे आईवडील व चुलता चुलती वयोवृद्ध आहेत. भूसंपादन नसताना, एक रूपयाची मदत नसताना, न्यायालयीन खटला सुरू असताना, कामाला मुदतवाढ नसताना हा प्रकार घडत आहे. माझ्या वयोवृद्ध आईवडील, चुलताचुलतीच्या तसेच आम्हा सहा भावंडांच्या मनावर या घटनेने आघात झाला आहे. चित्रपटात दाखवतात तसे कथानक आमच्या परिवाराबाबत घडत आहे. गावात नारायणगाव, जुन्नर, घोडेगावला जाण्यासाठी तीन शासकीय रस्ते असताना व कागदोपत्री त्याची नोंद असतानाही आमच्याच शेतातील तब्बल २६ गुंठे जमिनीवर पोलीसी बळावर अतिक्रमण झाले आहे. सरपंच व ग्रामपंचायत सदस्य विजयी उन्मादात आमच्याच जमिनिवर फोटोसेशन करत खोटी माहिती देत आहेत. आपण याप्रकरण चौकशी करून माहितीफलक व मुदतवाढ तपासून संबंधित ठेकेदार वामन, सुपरवायझर जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्यावर कारवाई करावी. मुदतवाढ नसणाऱ्या कामात योगदान देणारा जेसीपीही जप्त करावा. या घटनेत आमच्या घरातील कोणी मानसिक धक्क्याने दगावल्यास कंषाटदार वामन, सुपरवायझर जगदाळे, सरपंच आणि गेामपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषद अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.