नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-जुन्नर रोडवरील पिंपळगावातील उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) व चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) या दोघा वयोवृद्ध शेतकरी भावांची चोरीस गेलेल्या जमिनीचा महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून शोध घेऊन ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेतील दोषी घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून वयोवृद्ध शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-जुन्नर रोडवरील पिंपळगावातील उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) व चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) या दोघा वयोवृद्ध शेतकरी भावांची गट क्रं ३०८/ए मध्ये प्रत्येकी ९८.५ गुंठे शेतजमिन आहे. जवळपास ५ एकरला ५ गुंठे जागा कमी आहे. सरकारच्या सातबाऱ्यावर या दोन्ही वयोवृद्ध भावांची शेतजमिन व क्षेत्रफळ यांची नोंद आहे. या ५ एकर जमिनीचा शेतसारा महसूल विभाग दरवर्षी या भावांकडून वसूल करत आहे. या भावांच्या शेतजमिनीवर प्रशासनाने आजतागायत कोणत्याही प्रकारचे भूसंपादन केलेले नाही. शेताची (जमिनीची) मोजणी करून रोवण्यात आलेल्या खांबातून स्पष्टपणे निदर्शनास येते या दोन भावांच्या जमिनीत अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणाचीही कोठे नोंद नाही. जर हे अतिक्रमण जिल्हा परिषदेचे अधिकारी केवळ ही जागा जिल्हा परिषदेची आहे. अधिकृत आहे असे सांगत आहे आणि दुसरीकडे या दोन वयोवृद्ध भावांकडून दरवष्री शेतसारा महसूल विभाग घेत आहे. अतिक्रमित जागेचाही शेतसारा या दोघा वयोवृ्द्ध भावांना आजही भरावा लागत आहे. भूसंपादन नाही, दोघा वयोवृद्ध भावांना कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत न्यायालयात खटला असतानाही ग्रामपंचायत पैसे भरून पोलिसी पाठबळावर (संरक्षण) जिल्हा परिषदेला अतिक्रमणास मदत करत आहे. मुळातच हा रस्ता आहे तर उत्तम विष्णू खांडगे, चंद्रकांत विष्णू खांडगे या वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून आजपर्यत शेतसारा का घेत आहे, सातबाऱ्यावर ही अतिक्रमित जागा आजही दोघा वयोवृद्ध शेतकरी भावांच्या नावावर आहे. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निकाल लागला असून खांडगे परिवार निकाल हारल्याचे सांगत आहे. बाब न्यायप्रविष्ट असतानाही सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य खटला जिंकल्याचे व आमचा परिवार खटला हारल्याचे सांगत आहे. वास्तवात न्यायालयात अजूनही न्यायालयीन खटला सुरू आहे. जुलै महिन्यात आगामी तारीख आहे. आम्ही भरत असलेल्या शेतसाऱ्याची जमिन व सातबाऱ्यावर असलेली जमिन आम्हाला हवी आहे. भूसंपादन झाले नाही म्हणजे आजही आमची जमिन आमच्या ताब्यात हवी. सातबाऱ्यावर असलेली जमिन व आम्ही शेतसारा भरत असलेली जमिन पोलिस विभागाने महसूल व कृषी विभागाच्या मदतीने शोधून द्यावी. जर ही सातबाऱ्यावर असलेली जमिन व आम्ही शेतसारा भरत असलेली जमिन न सापडल्यास ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेमधील जे जे घटक सातबारा व शेतसारा भरत असलेल्या जमिनीतील जी जमिन सापडत नसेल ती त्यांनी चोरली असल्याचे समजून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. आम्हाला आमची कागदोपत्री सातबाऱ्यावर असलेली जमिन व शेतसारा भरत असलेली जमिन हवी आहे. गावात तीन शासकीय रस्ते नारायणगाव, जुन्नर, घोडेगावला जाण्यासाठी उपलब्ध असताना व या तीनही रस्त्याची सरकारदरबारी नस्तीमध्ये नोंद असताना आमच्या शेतजमिनीचे भूसंपादन नसतानाही खुलेआमपणे पोलिसि बळावर , न्यायालयीन खटला जिंकल्याचे खोटे सांगत व आमच्याच शेतजमिनीवर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य फोटोसेशन करत आहे. आमची चोरीला गेलेल्या जमिनीचा शोध लावावा. जितकी जमिन सापडणार नाही त्याबाबत आमच्या शेतजमिनीतील अतिक्रमण प्रकरणी जिल्हा परिषद अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर शेतजमिन चोरी तसेच दोन वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या परिवाराला जाणिवपूर्वक मानसिक त्रास याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
साहेब आपणाकडून आम्हा दोन शेतकरी परिवाराला खुप आशा आहेत. आपण आपल्या कार्यालयात बोलवाल तेव्हा आम्ही येवून सर्व कागदोपत्री पुरावे सादर करू. आमच्या गावातील एक घटक मंत्रालयात कामाला असल्याने मंत्रालयीन ओळखीच्या बळावर आमच्या दोन्ही परिवाराची मुस्कटदाबी सुरू आहे. आमच्या चोरीस गेलेल्या जमिनीचा राज्य सरकारने शोध घेण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच आमच्या शेतजमिनीतील तब्बल २६ गुंठे जमिनीचा खेळखंडोबा आमच्याच गावातील मंत्रालयात काम करणारा एक घटक करत आहे. या तणावामुळे आमच्या घरातील चार वयोवृद्ध लोकांचे अथवा आम्हा पाच भावातील कोणाचेही मानसिक धक्क्यामुळे निधन झाल्यास त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, मंत्रालयात काम करून ओळखीच्या बळावर सर्व घडवून आणणारा घटक जबाबदार राहील. आपण आमची चोरीस गेलेली जमिन पुन्हा मिळवून देण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.